Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अट्रावलमध्ये ७ जणांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

atrawal problem

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील अट्रावल येथे एका समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी ७ जणांविरुद्ध अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील अट्रावल येथे धोंडू जगन कोळी, गोलू कोळी, आकाश भागवत कोळी, जितु प्रकाश कोळी, हितेश विक्रम कोळी, पवन कोळी, लखन दिनकर कोळी यांनी एका समुदायाच्या धार्मिक भावना दुखावतील, असे कृत्य करत साहित्याची नासधूस केली. याप्रकरणी अशोक तायडे यांच्या फिर्यादीवरून ट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गावात कोणताही वाद होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. पुढील तपास फैजपूरचे डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली यावलचे पोलिस निरीक्षक रविकांत सोनवणे हे करत आहेत.

Exit mobile version