Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सिनिअर डॉक्टरांवर अट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी

WhatsApp Image 2019 05 23 at 9.08.50 PM

यावल ( प्रतिनिधी) मुंबई येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या आदीवासी तरूणीची सिनिअरकडुन करण्यात येणाऱ्या रॅगींगच्या छळाला कंटाळुन काल बुधवारी रात्री मुंबई येथे हॉस्टलच्या खोलीत गळफास घेवुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असुन या संदर्भात आग्रीपाडा भायखळा , मुंबई येथे तिघा सिनिअर डॉक्टर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

या पूर्वी मयत डॉ. पायल सलमा तडवी यांची आई यांनी दिनांक १० मे रोजी राज्याचे आरोग्यमंत्री, पोलीस निरीक्षक, आग्रीपाडा पोलीस स्टेशन , भायखळा नायर हॉस्पीटल मुंबईच्या एचओ.डी. यांच्याकडे त्यांच्या मुलीला होणाऱ्या त्रासाबद्दल याबाबत तक्रार केली आहे. या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की , त्यांची मुलगी पायल हीने नायर हॉस्पीटल मुंबई येथे स्त्रीरोग वैद्यकीय अभ्यासासाठी प्रवेश घेतला असून तिचे शिक्षणाचे दुसरे वर्ष आहे. तिच्या सिनिअर असणाऱ्या डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती महीरे, व डॉ. अंकीता खंडेलवाल ह्या पायलच्या प्रवेश घेतल्यापासून तीला मानसिक त्रास देत आहेत. यात हॉस्पिटमध्ये रुग्णांसमोर तिचा अपमान करणे, तिच्या वैद्यकीय अभ्यासात अडचणी निर्माण करणे, .वरिष्ठांकडे तक्रारार करण्याची धमकी देणे यांचा समवेश आहे. यासोबतच व्हॉट स् अॅपग्रुप वर तिच्याबद्दल नको ते कॅमेंटस करतात. आदीवासी समाजाचे असून पायल ही एकटी मुलगी आहे. तिचा मानसिक छळ करणाऱ्या सिनिअर डॉक्टर तिला जातीवाचक व अपमानास्पद वागणुक देत असतात. या सर्व प्रकारामुळे माझ्या मुलीची मानसिक स्थिती बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी शंका उपस्थित केली होती. जर पायलचे काही बरे वाईट झाल्यास तिघा सिनियर डॉक्टर जबाबदार राहतील अशी स्पस्ट तक्रार केली होती. मानसिक त्रास टाळण्यासाठी तिचे युनिट बदलाची देखील मागणी केली होती. परंतु, या तिघ डॉक्टर्स कडून मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीचा त्रास असहाय झाल्याने काल रात्री तिने गळफास घेवुन आपली जिवनयात्रा संपवली. या सर्व झालेल्या संतापजनक प्रकाराचे महाराष्ट्र राज्य आदीवासी तडवी भिल्ल एकता संघाचे, प्रदेश अध्यक्ष एम.बी. तडवी, जळगाव जिल्हा तडवी डॉक्टर्स फाउंडेशनच्या वतीने घटनेचा तीव्र जाहीर निषेध केला असुन यातील दोषींवर कडक कार्यवाही व्हावी अशी मागणी केली आहे.

Exit mobile version