Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अट्रावलच्या अष्टपैलू कल्पेशची आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |आदिवासी क्षेत्र म्हणुन  ओळखल्या जाणाऱ्या यावल तालुक्यातील अट्रावल या अगदी छोटयाशा गावात जन्मास आलेल्या कल्पेश शिरसाळे या उदयोन्मुख तरुण  अष्टपैलु खेळाडूची अंतराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धसाठी निवड झाली आहे. त्याचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

 

अट्रावल तालुका यावल येथील रहीवासी असलेल्या कल्पेश नारायण क्षिरसाळे हा फैजपुर येथील डीएन कॉलेज मधील मराठी एमएचा विद्यार्थी आहे.  मध्यवर्गीय कुटुंबात जन्माला आलेल्या कल्पेश यास लहाणपणापासुनच क्रिकेट खेळण्याचा छंद होता. अट्रावल सारख्या छोट्या गावात अतिशय प्रतिकुल परिस्थितीत कल्पेश याने अंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धपर्यंत भरारी घेतली आहे . दि. ८ ऑक्टोबर २०२२ पासुन UAE दुबई येथे सुरू होणाऱ्या अंतरराष्ट्रीय लिग क्रिकेट स्पर्धसाठी कल्पेश  याची INCL इंडीयन नॅशनल क्रिकेट संघ निवड करण्यात आली आहे.  या संघात निवड झालेला तो महाराष्ट्र राज्यातून एकमेव खेळाडु आहे.  नुकत्याच ( राजस्थान ) येथे झालेल्या अंतरराज्य क्रिकेट स्पर्धतील सराव सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते.  या सराव सामन्यांमध्ये देशातील सुमारे ५००च्या वर क्रिकेट खेळाडूंनी भाग घेतला होता यापैकी संपुर्ण देशातू  ३० खेळाडुंची निवड करण्यात आली.  त्यात महाराष्ट्र राज्यातून कल्पेश शिरसाळे हा एकमेव खेळाडूची निवड करण्यात आली.   या INCL इंडीयन नॅशनल क्रिकेट संघ, मुंबईच्या निवडी झालेल्या प्रशिक्षणार्थ घेण्यात आलेल्या सराव सामाऱ्यात कल्पेश यांने केलेल्या अष्टपैलू कामगिरीमुळे त्याची ही निवड करण्यात आली आहे.  या सामन्यासाठी प्रशिक्षक म्हणुन सलाह काजी व मधुसर यांचे मार्गदर्शन त्यास लाभले.

 

Exit mobile version