Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

किनोद येथे अत्तरदे यांचा झंझावाती प्रचार दौरा

WhatsApp Image 2019 10 16 at 7.43.25 PM

किनोद, प्रतिनिधी | जळगाव ग्रामीण मतदारसंघात अपक्ष उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांचा किनोद येथे प्रचार दौरा आज १६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४.०० वा. मोठ्या उत्साहाने पार पडला.

किनोद येथे अपक्ष उमदेवार चंद्रशेखर अत्तरदे यांनी प्रचार रली काढली. यावेळी त्यांच्यासोबत जि.प. सदस्या माधुरीताई अत्तरदे देखील होत्या. ग्रामस्थांनी श्री. व सौ. अत्तरदे यांचे औक्षण करून फुलहार देऊन स्वागत केले. यावेळी गावातील नागरिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी माजी कृ.उ.बा.स. सभापति लकी आण्णा उर्फ लक्ष्मण गंगाराम पाटील, गावातील सरपंच, ग्रा.पं. सदस्य, प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. तसेच ममुराबाद-आसोदा गटातील शक्ति प्रमुख नरेंद्र पाटील, भूषण बावीस्कर, समाधान कोळी, किरण पाटील, बूथ प्रमुख अशोक सपकाळे उपस्थित होते. त्यांच्यासोबत विवेक सपकाळे, अशोक चव्हाण, बापू कोळी, मोरेश्वर सरोदे, विजय सपकाळे, मनेश सपकाळे, राजेंद्र पाटील, किरण पाटील, गोपाल मोरे, सुधीर पाटील, रविंद्र पाटील तसेच गटातील बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पन्ना प्रमुख तसेच पदाधिकारी यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version