Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथे दोन जणांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण

यावल प्रतिनिधी । यावल येथील कैकाडी वाडा येथे काहीही कारण नसताना एकाने दोन जणांना लोखंडी रॉडने मारहाण केल्याचे घटना घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की,  शहाब खान अयास खान (वय-२२) रा. काझीपुरा यावल आणि शेख फरीद शेख शरीफ (वय-१४) रा. राखिनीपुरा, यावल हे दोघे १२ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास कैकाडी वाडा येथे फिरत  होते. त्याठिकाणी दिलीप उर्फ बापू अशोक बारी (वय-४४) रा. संभाजी पेठ याने  काहीही कारण नसताना  लोखंडी रॉडने दोघांना मारण्यास सुरूवात केली. यात शहाब याला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी शहाब खान यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात दिलीप बारी याच्या विरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.एस. पठाण करीत आहे.

Exit mobile version