यावल येथे ३११ जणांची अॅन्टीजन तपासणीत ८ जण पॉझिटीव्ह

 

यावल,  प्रतिनिधी ।   येथील नगर परिषद व व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने कृषी उत्पन्न बाजार समिती येथे परराज्यातील येणाऱ्या ट्रक चालकांची व   केळी आणि इतर भरडधान्याचे ट्रक भरण्यासाठी येणाऱ्या हमाल, मापाडी यांची रॅपिड अॅन्टीजेन  चाचणी करण्यात आली. बाजार समितीत २ व्यक्ती पॉझिटीव्ह आढळून आल्या आहेत.

यावल नगर परिषद व पोलीस प्रशासनातर्फे कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात केळी आणि इतर भरडधान्याचे ट्रक भरण्यासाठी येणाऱ्या हमाल, मापाडी व इतर राज्यातुन घेणारी ट्रक वाहन चालकांची    ११७ जणांची रॅपिड अॅन्टीजन चाचणी घेण्यात आली.  यात भालोद येथील ५२ वर्षीय व्यक्ती तर उत्तर प्रदेश राज्यातुन ट्रक वाहन घेवुन येणारा ४०वर्षीय चालकाचा समावेश आहे.  याप्रसंगी बाजार समिती सभापती तुषार (मुन्नाभाऊ) पाटील, कृउबाचे सचिव स्वप्नील सोनवणे, नगर परिषदचे कार्यालयीन अधिक्षक  विजय बढे व आरोग्य निरिक्षक शिवानंद कानडे,  रविंद्र काटकर, नितीन पारधे, रामदास घारू, लखन घारू, संदीप पारधे, विश्वनाथ गजरे व बाजार समिती, न. पा. कर्मचारी बांधव तसेच पो.हे.कॉ. सलिम शेख, गृहरक्षक दलाचे कर्मचारी अतुल फेगडे यांनी या अॅन्टीजन तपासणी शिबीरात सहभाग घेतला.  दरम्यान काल दिनांक १७ एप्रिल रोजी सायंकाळ ७ वाजेपर्यंत यावल शहरातील सार्वजनिक ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्या २६१नागरीकांच्या नगर परिषदच्या वतीने अॅन्टीजन  रॅपीड तपासणी करण्यात आली असता त्यातील सहा जणांचे तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.  यात शहरातील एक व्यक्ती  पॉझिटीव्ह आली  तर पाच जण हे बाहेरील असल्याचे नगर परिषदच्या सुत्रांकडुन सांगण्यात आले. पोलीस निरिक्षक सुधीर पाटील , पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले, पोलीस उपनिरिक्षक जितेंद्र खैरनार, सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान, पोलीस अमलदार भुषण चव्हाण, पोलीस अमलदार सलीम शेख, पोहॅकॉ असलम शेख व गृहरक्षकदलाच्या कर्मचारी यांनी केलेल्या संयुक्त कार्यवाहीत २८विना मास्क व कुठलेही काम नसतांना फिरणाऱ्या रिक्काम्या मंडळीकडुन दंडात्मक वसुली करण्यात आली तर पोलीसांनी ४० जणांची अॅन्टीजन रॅपीड तपासणी केली असुन यात सर्व निगेटीव्ह आले आहेत.

 

Protected Content