विद्यापीठात महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाचे आयोजन

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच, बुध्दिष्ट अध्ययन व संशोधन केंद्र, डॉ.बाबसाहेब आंबेडकर विचारधारा विभाग, महात्मा फुले अध्ययन व संशोधन केंद्र, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि मागासवर्गीय शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दि.११ ते १४ एप्रिल दरम्यान महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवार रोजी भाषा अभ्यास व संशोधन केंद्र प्रशाळेचे प्रा.डॉ.म.सु.पगारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी बैठकीत प्रा.डॉ.अनिल चिकाटे यांनी जयंती महोत्सवाविषयी रूपरेषा विशद केली. डॉ.म.सू.पगारे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. जयंती महोत्सवाचे समन्वयक म्हणून प्रा.डॉ. अनिल चिकाटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. जयंती महोत्सवासाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले. यावेळी यु.आय.सी.टी. चे संचालक तथा व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा.डॉ.जितेंद्र नाईक, व्यवस्थापनशास्त्र आणि विचारधारा प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ.अनिल डोंगरे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक तथा सिनेट सदस्य प्रा.डॉ.अजय सुरवाडे, ज्ञानस्त्रोत केंद्र तसेच कला व मानव्यविद्या प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ. अनिल चिकाटे तसेच मागासवर्गीय शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जयंत सोनवणे उपस्थित होते. सुत्रसंचालन डॉ.विजय घोरपडे यांनी केले. आभार प्रा.डॉ. अनिल चिकाटे यांनी मानले.

बैठकीस जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.सुधीर भटकर, प्रा.डॉ.विनोद निताळे, हर्षल पाटील, दीपक खरात, डॉ.विश्रांती मुंजेवार, कृष्णा संदानशिव शिक्षकेत्तर अधिकारी व कर्मचारी मनोज वराडे, अजमल जाधव, जगदीश सुरळकर, प्रवीण चंदनकर, भिमराव तायडे, राजू सोनवणे, अरुण सपकाळे, अमृत दाभाडे, वैशाली वराडे, अलका भुते, मुकुंद बाविस्कर, सुभाष पवार, संजय सपकाळे, लालचंद पावरा, विनोद भालेराव, दिलीप अल्हाट, ईश्वर जाधव, चंद्रकांत वानखेडे, विकास बिऱ्हाडे, भारत उफाडे, योगेश राठोड, शशीकांत राठोड, किरण राऊत, यांच्यासह इतर कर्मचारीही उपस्थित होते.

 

Protected Content