Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘अभिव्यक्ती’ सांस्कृतिक महोत्सवात ‘मुकनाट्य’ प्रथम तर ‘लग्नाळू’ व्दितीय

bhusaval clg

भुसावळ प्रतिनिधी । जळगाव येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे नुकतेच ‘अभिव्यक्ती’ सांस्कृतिक महोत्सव घेण्यात आला. या महोत्सवात भुसावळ येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे मुकनाट्य प्रथम, तर ‘लग्नाळू’ या विडंबन नाट्याला व्दितीय क्रमांकाचे सांघिक पारितोषिक प्राप्त झाले.

या महोत्सवात मुकनाट्य आणि विडंबन नाट्य प्रकारात श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालय, भुसावळच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. महाविद्यालयाने सादर केलेल्या मुकनाट्याला प्रथम क्रमांकाचे तर लग्नाळू या विडंबन नाट्याला व्दितीय क्रमांकाचे सांघिक पारितोषिक प्राप्त झाले. मुकनाट्यासाठी 4 अभियांत्रिकी महाविद्यालय तर विडंबन नाट्यासाठी एकूण 8 महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला होता. तसेच महोत्सवातील मुकनाट्य स्पर्धेत सलग चार वेळा विजेतेपद मिळवण्याचा मान श्री संत गाडगेबाबा महाविद्यालयाने पटकावला.

महाविद्यालयाच्या अजय पाटील याने दिग्दर्शित केलेल्या मुकनाट्यात महाविद्यालयाचे मानसी पाटील, पंकज सोनवणे, सुवर्णा भोर्इ, प्रियंका गोसावी, निकिता महाजन, पुष्पकुमार खरे, शैलश बावणे, रितेश वानखेडे इ. विद्यार्थी सहभागी झाले होते.  तर मानसी पाटील हीने दिग्दर्शित केलेल्या ‘लग्नाळू’ या विडंबन नाट्यात अजय पाटील, मानसी पाटील व रितेश वानखडे यांनी भुमिका साकारल्या होत्या.

सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ.आर.पी.सिंग, ॲकेडेमिक डीन डॉ. राहुल बारजिभे, विभाग प्रमुख प्रा. डी.डी.पाटील, प्रा.वाय.एस.पाटील, प्रा.प्रिती सुब्रमण्यम, प्रा.आर.पी.चौधरी, प्रा.ए.पी.इंगळे या प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. अभिव्यक्ती सांस्कृतिक महोत्सवातील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाने प्राप्त केलेल्या घवघवीत यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक सर्व स्तरावरून होत आहे.

Exit mobile version