Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मानराज पार्क येथे महिलेच्या हातातून मोबाईल लांबविला

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मानराज पार्क परिसरात पायी जाणाऱ्या महिलेच्या हातातून ८ हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने हिसकावून पळ काढल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, रश्मी राजेंद्र जैन (वय-२६) रा. मानराज पार्क जळगाव ह्या सोमवारी सायंकाळी ८ वाजता मानराज पार्क परिसरातील रोडवर एकट्या पायी जात असतांना मागुन एक अनोळखी व्यक्तीने रश्मी जैन यांच्या हातातील ८ हजार रूपये किंमतीचा मोबाईल जबरी हिसकावून पळ काढल्याची घटना उघडकीला आली. त्यांनी आरडाओरड केली परंतू चोरटा फरा झाला होता. जैन यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप परदेशी करीत आहे.

Exit mobile version