Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

करंजी येथे ग्रामसेविका व सरपंचाने केला १४ वित्त आयोगाचा निधी हडप

बोदवड प्रतिनिधी । तालुक्यातील करंजी ग्रामपंचायत सरपंच जानकिराम पाटील व ग्रामसेविका शिल्पा अंभोरे यांनी संगममताने १४ वित्त आयोगाचा निधी परस्पर ठेकेदाराच्या नावे काढण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव व गटविकास अधिकारी पंचायत समिती बोदवड यांच्याकडे लेखी निवेदनव्दारे केली आहे. 

करंजी पाचदेवडी येथे १४ वित्त आयोगातुन रस्ते कॉक्रेटिकरन करण्यासाठी ठराव मंजुर होता. त्या कामाबाबत कामे व्हावे, यासाठी सबंधीत ठेकेदाराने गावात रेती सिमेंट इत्यादी रस्त्यासाठी लागणारे साहित्य टाकले. परंतु कामे नकरताच ग्रामसेवक व सरपंच यांच्या सगंममताने ठेकेदाराच्या नावावर पुर्ण रक्कम वर्ग करण्यात आली आहे. अशी स्वता:हा कबुली ग्रामसेविका शिल्पा अंभोरे यांनी दिली आहे.  तसेच ग्रामसेविका शिल्पा अंभोरे यांच्याकडे गोळेगाव करंजी असे गावे आहेत. 

तसेच गोळेगाव येथे अंभोरे यांना चार वर्षे तरी कामाचा कार्यकाळ झाला असावा. त्यामुळे गोळेगाव येथिल प्रस्थापित राजकिय मंडळीशी चांगलेच साटेलोटे आहेत. त्याच हेतुन करंजी येथिल झालेल्या प्रकरणात गोळेगाव येथिल व्यक्तिही यात येऊ शकतात अशी दाट शक्यता आहे. तसेच गोळेगाव येथिल राजकिय मंडळी व करंजी येथिल सरपंच व ग्रामसेविका यांनी हे काम न करताच एका ठेकेदाराच्या नावावर टाकण्याचा साहस केल्याने करंजी गावातील नागरीक चांगलेच संतापलेले दिसुन आले. 

तसेच करंजी येथे रोजगार हमितील घरकुल लाभार्थ्यांही निधी हडपलेला असल्याची चर्चा गावातील नागरीक करित आहेत. तसेच १४ वित्त आयोगाचा निधी कामे नकरता ठेकेदाराच्या नावावर परस्पर पाठवला याची चौकशी होऊन कार्यवाही व्हावी, अशी तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव व गटविकास अधिकारी पंचायत समिती बोदवड यांच्याकडे लेखी निवेदन देण्यात आले आहे. 

त्या निवेदनावर सविता विकास पाटील उपसरपंच ,ज्योती शशिकात पाटील सदस्य, उत्तम पंढरी सुरवाडे सदस्य यांच्या समवेत गावातील नागरीकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

Exit mobile version