Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भोपाळ येथे गणेश विसर्जनावेळी बोट उलटली ; ११ भक्त बुडाले

Master

 

भोपाळ (प्रतिनिधी) भोपाळ येथे गणपती विसर्जनाच्या दरम्यान बोट उलटून ११ लोक बुडाल्याची घटना घडली आहे. बुडालेल्या बोटीत एकूण १८ लोक होते. यातील सात बेपत्ता लोकांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, भोपाळमधील खटलापुरा घाटावर शुक्रवारी पहाटे हा अपघात झाला. अपघातग्रस्त बोटीत बसलेले लोक विसर्जनासाठी तलावाच्या दुसऱ्या काठाकडे चालले होते. बोटीत क्षमतेपेक्षा जास्त लोक बसले होते. याच बोटीवर मोठी गणेशमूर्ती होती. विसर्जनासाठी मूर्ती पाण्यात उतरवताना बोट एका बाजूला कलली आणि उलटली. त्यामुळे लोकांनी दुसऱ्या नावेवर उड्या घेतल्या. यामुळे नावेचे संतुलन बिघडले. या अपघातात 11 जणांचा मृत्यू दुर्दैवी आहे. जनसंपर्क मंत्री पीसी शर्मा यांनी या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केले असून या अपघातात 11 जणांचा मृत्यू दुर्दैवी आहे. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल. तसेच ही घटना कशी घडली याबाबत चौकशी करण्याची घोषणाही करण्यात आली आहे.

Exit mobile version