Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगाव येथे डॉक्टरने केला रुग्ण तरुणीचा विनयभंग

crime

चाळीसगाव, प्रतिनिधी | येथील श्री सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे २३ वर्षीय रुग्ण तरूणीचा उपचार करतो असे सांगून विनयभंग करण्याचा प्रकार या रुग्णालयाचे डॉ. एम. बी. परदेशी यांनी केला असून सदर तरुणीने चाळीसगाव पोलिसात आज दिलेल्या फिर्यादी वरून डॉक्टर च्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबद्दल मिळालेली माहिती अशी की, शहरातील श्री सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये दिनांक २५ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ७-३० ते ७-४५ वाजेदरम्यान एका २३ वर्षीय तरुणीवर आय सी यु कक्षामध्ये उपचार सुरू असतांना डॉ. एम. बी. परदेशी यांनी दरवाजा बंद करून उपचार करतो असे सांगून तरुणीला लज्जा निर्माण होईल असे कृत्य केल्याने सदर तरुणीच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बापूराव भोसले हे करीत आहेत.

Exit mobile version