Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पोलीस मुख्यालयात २० हजाराची लाच घेणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला अटक

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा पोलीस मुख्यालयातील महिला दक्षता विभागातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला २० हजाराची लाच घेतल्याप्रकरणी रंगेहात पकडल्याची घटना आज दुपारी घडली. या कारवाईमुळे पोलीस मुख्यालयात खळबळ उडाली आहे.

पोलीस उपनिरीक्षक मिलींद केदार असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. जळगाव जिल्हा पोलीस मुख्यालयाच्‍या परिसरात असलेल्या महिला दक्षता समिती कार्यालयात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिलींद केदार यांनी एका प्रकरणात तक्रार यांच्याकडून २० हजाराची लाचेची मागणी केली होती. यासंदर्भात तक्रारदार यांनी जळगाव येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. त्यांच्या तक्रारीनुसार लाचलुचपत विभागाने कारवाई करत २० हजाराची लाच घेतांना अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव व सहकार्‍यांनी हा सापळा यशस्वी केला.

Exit mobile version