Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विधानसभा निवडणूक खर्च निरीक्षक अधिकारी जिल्ह्यात दाखल

election

जळगाव प्रतिनिधी । भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रात निवडणूक खर्च निरीक्षक अधिकारी यांची आज नियुक्ती करण्यात आली असून सर्व निरिक्षक अधिकारी जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, सर्व खर्च निरीक्षकांची जिल्ह्यात नियुक्ती झाली असून निरिक्षकांची निवास व्यवस्था पद्मायल शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे करण्यात आली आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय खर्च निरिक्षकांची नावे व त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहे. यासर्व चोपडा, रावेर व भुसावळसाठी हरीसन ॲन्टोनी, (मो.नं- 9446824695), निवास व्यवस्था- मुक्ता येथे आहे. जळगाव शहर व जळगाव ग्रामीणसाठी मम्म्नोन अलाम, (मो.नं- 9399657749), निवास व्यवस्था- बहिणाबाई येथे आहे. अमळनेर व एरंडोलसाठी बिस्वनाथ दास, (मो.नं- 8902350384), निवास व्यवस्था- सावित्री येथे आहे. चाळीसगाव व पाचोरासाठी अनंथ आर, (मो.नं- 9003145102), निवास व्यवस्था- जीजाऊ येथे आहे. आणि जामनेर व मुक्ताईनगरसाठी देवाशीष पॉल, (मो.नं- 9895466916), निवास व्यवस्था- फातीमाबी येथे आहे.

मतदारांना निवडणूकी संदर्भात काही तक्रारी अथवा अडचण मांडावयाची असल्यास निवडणूक खर्च निरीक्षकांशी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. असे डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, यांनी कळविले आहे.

Exit mobile version