Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

क्रेडीटकार्ड बंद करण्याचे सांगून लावला १ लाखांचा चुना !

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । क्रेडिट कार्ड बंद करून देण्याचे सांगून एका वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला ऑनलाइन पद्धतीने १ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना सोमवारी उघडकीला आले आहे. या संदर्भात पहूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, वसीम अब्दुल नईम शेख वय 42 रा. पहूर पेठ ता. जामनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून वैद्यकीय व्यवसाय करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. २६ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजता त्यांना एका अनोळखी नंबर वरून फोन आला. त्यात त्यात त्याने सांगितले की, आपण एसबीआय क्रेडीट कार्ड ऑफिसमधून बोलत आहे तुमच्या क्रेडिट कार्ड बंद करून देतो असे सांगून त्याने क्रेडिट कार्ड मधील अकाउंटमधून परस्पर रित्या १ लाख रुपयांची ऑनलाईन ट्रांजेक्शन करून फसवणूक केली. दरम्यान हा प्रकार लक्षात आल्यानंतर वसीम शेख यांनी तातडीने पहुर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन सानप हे करीत आहे.

Exit mobile version