Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अशोक चव्हाण यांच्यावर मराठा समाजाच्या मागण्यांच्या पाठपुराव्याची जबाबदारी


मुंबई प्रतिनिधी । काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाच्या विविध मागण्यांच्या पाठपुराव्याची 
जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठा समाजाच्या विविध मागण्यांच्या पाठपुराव्याची जबाबदारी अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीकडे सोपवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानुसार मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात संबंधित विभागाचे मंत्री व सचिवांची बैठक घेऊन शासनाला प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील उपसमितीकडेच सोपवण्यात आली आहे. मराठा आरक्षणविषयक कायदेशीर बाबींचा पाठपुरावा करणाऱ्या या उपसमितीत एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, विजय वडेट्टीवार सदस्य आहेत. हीच समिती आता मराठा समाजाच्या इतर मागण्यांचाही पाठपुरावा करेल.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन गेल्या अनेक दिवसांपासून भाजपाचे काही नेते अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी करीत होते. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशोक चव्हाण यांच्या जबाबदारीत वाढ करुन भाजपाला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

Exit mobile version