Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आशिष शेलार यांना जामीन : गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात धाव

मुंबई प्रतिनिधी | मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात भाजप नेते आशिष शेलार यांना जामीन मंजूर करण्यात आलेला असून त्यांनी हा गुन्हा रद्द व्हावा यासाठी हायकोर्टात धाव घेतले आहे.

एका आक्षेपार्ह वक्तव्यावरुन महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजप आमदार आशिष शेलार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर आशिष शेलार यांनी जामीनासाठी अर्ज केला. त्यानंतर शेलार यांना १ लाखाचा ऑनटेबल जामीन मंजूर केला आहे. इतकंच नाही तर शेलार यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत महापौरांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आहे.

या संदर्भात शेलार म्हणाले की, आम्ही कायदा सुव्यवस्था मानणारे आहोत, न्यायिक व्यवस्थेला मानणारे आहोत. त्यामुळे खोटा का होईना गुन्हा त्यांनी काल दाखल केला त्याबद्दल मी जामीन घेतला. त्याबरोबरीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये हा एफआयआर क्वॅश केला पाहिजे, न्यायिक व्यवस्थेतून सत्य मी बाहेर आणेन, पण यांना पुन्हा सांगू इच्छितो की, आम्ही सगळे सहकारी शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणाविरोधात संघर्ष अजून कडवा करु. तुम्ही जेवढा आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कराल, भारतीय जनता पार्टी तो आवाज अजून उचलेल आणि तुमची कृत्ये जनतेसमोर उघड करुफ, असा इशारा शेलार यांनी दिला.

Exit mobile version