Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक हातात लाटणे घेवून महापालिकेवर धडकल्या (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्‍या तीन ते चार महिन्यांपासून थकीत मानधन यासह इतर विविध मागण्यांसाठी अशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक महिला यांनी हातात लाटणे घेवून व मोर्चा काढून महापालिकेवर धडकल्या.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की. कोरोना काळात प्रशासनाच्या बरोबरीने आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांनी काम केले आहे. परंतू ठरल्याप्रमाणे कामाचा मोबादला शासनाकडून मिळालेला नाही. प्रलंबित मागण्यांसाठी अनेकदा आंदोलने करण्यात येऊनही मागण्या मान्य होत नसल्याने, आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक आक्रमक झाल्या आहेत. महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समिती व  सीसीटीव्हीच्या नेतृत्त्वात गटप्रवर्तक व आशासेविकांनी महापालिकेवर लाटणे मोर्चा काढला. लाटणे हातात धरुन अशा सेविकांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध नोंदवला.  जर मागण्या मान्य झाल्या नाही तर लाटण्याने प्रशासनाला धडा शिकवू असा इशाराही आंदोलानात दिला आहे.

Exit mobile version