Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आशा सेविकांनी साजरा केला मानधन वाढीचा आनंद

 

चोपडा प्रतिनिधी । तालूक्यातील सातही प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा सेविकांनी गेल्या आठवड्यात दि. 9 ते 17 सप्टेंबर दरम्यान मानधन वाढीबाबत जीआर काढावा यासाठी आंदोलन करण्यात आले होते. यामुळे सरकारला मानधनवाढीचा (दि.16) रोजी जीआर काढावा लागला आहे. यानिर्णयाने आशा सेविकांमध्ये मानधन वाढीचा आनंद साजरा करण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालूक्यातील सातही प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा सेविकांनी महाराष्ट्र राज्य आरोग्यखाते आशा व गटप्रवर्तक संघटना आयटक जळगाव जिल्हा शाखेचे अध्यक्ष कॉ. अमृत महाजन यांच्या नेतृत्वात जळगाव येथे 9 ते 17 सप्टेंबर दरम्यान आंदोलने केली होती. सरकारने मानधन वाढीचा जीआर काढावा, म्हणून कामावर बहिष्कार ही घातला पूर्ण महाराष्ट्र राज्य अशा आंदोलनानी घुसळून निघाले. यामुळे सरकारला मानधनवाढीचा जीआर काढावा लागला. पहिल्यांदा सरकारला गेल्या 12 वर्षातून स्वता:च्या हिस्सातून 156 कोटी रुपयांची भागीदारी करावी लागली आहे. त्यासाठी 156 कोटी रूपयांची गेल्या 12 वर्षात पहिल्यांदा सरकारला स्वतःचा हिस्साची भागिदारी करावी लागली. गटप्रवर्तक याचेसाठी 1दिवसांसाठी जास्त रेठून ठेवल्याने त्यांनाही 2 हजार 500 रुपये ते 3 हजार रूपये वाढवून देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.

त्यामूळे आंदोलनार्थी आशांचे प्रतिनिधी यांनी चोपडा येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला माल्यार्पण करून व कार्यालयात एकमेकींना पेढा खाऊ घालून आज आनंद साजरा केला आहे. आजपासून कामावरील बहिष्कार मागे घेतला व एनएचएमके कामांना सूरूवात केली. त्याबरोबर तालूका वैद्यकीय अधिकारी डॉ.लासूरकर यांना गोरगावले, लासूर, धानोरा पीएचसीतील आशांचे 5 महिन्यांचे थकित मोबदले व व्हिएचएनसीचे अनूदान मिळावे, जेएसवाय केसेसची आशा 5 ते 6 महिने काळजी घेते आणि ऐन वेळेस काही नर्सेस त्या महिलांना भूलथापा देऊन कूटूंब नियोजन केस हायजॅक करतात ते बंद करावे, याबाबतची लेखी नाराजी या आशा प्रतिनिधींनी व्यक्त केली. निवेदनावर आशा प्रतिनिधी मीनाक्षी सोनवणे, वंदना पाटील, वंदना सोनार, शितल पाटील, आक्का पावरा, शालीनी पाटील, शरिफा तडवी, अलका पाटील, रत्ना शिरसाठ, मिना चौधरी, संगिता मराठे, मनिषा पाटील, शोभा पाटील, सरला बाविस्कर आणि उषा सोनवणे यांच्यासह आदी महिल्यांच्या सह्या आहेत.

Exit mobile version