Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शासनाच्या नवीन हिट अँन्ड रन कायदयाविरोधात दिपनगरातील राखेची वाहतूक करणारे चालक आक्रमक

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भुसावळ दिपनगर केंद्र सरकारने वाहनचालकांसाठी केलेल्या नवीन कायद्यामुळे राखेची वाहतूक करणारे बलकर चालक आक्रमक झालेले आहे. नवीन कायदा रद्द होत नाही तोपर्यंत दिपनगर वीज निर्मिती प्रकल्पातून राखेची उचल न करण्याचा पवित्रा चालकांनी घेतला आहे.

बलकर वाहन चालकांनी वाहन न चालवण्याचा निर्णय घेतल्याने भुसावळ येथील दिपनगर वीज निर्मिती प्रकल्प बाहेर शेकडो बलकर उभे आहे.वीज निर्मिती प्रकल्पातून राखेची उचल न झाल्यास वीज निर्मिती प्रकल्पासह खाजगी कंपन्यांवर  परिणाम होण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने वाहन चालकांसाठी केलेल्या नवीन कायद्याच्या विरोधात भुसावळ येथील दीपनगर वीज निर्मिती प्रकल्पातून राखेची उचल करणारे बलकर वाहन चालकांनी काम बंद केले असून यामुळे दीपनगर प्रकल्पाबाहेर शेकडो बलकर काल पासून उभे आहेत. तर वीज निर्मिती प्रकल्पातून राखेची उचल न झाल्यास दीपनगर वीज निर्मिती प्रकल्पासह खाजगी सिमेंट कंपन्यांवर देखील याचा परिणाम होण्याची शक्यता असून जोपर्यंत केंद्र सरकार हा कायदा रद्द करत नाही तोपर्यंत स्टेरिंग वर न बसण्याचा निर्णय बलकर वाहन चालकांनी घेतला आहे.

Exit mobile version