Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एफ-१६ दिसताच अभिनंदन सहकाऱ्यांंना म्हणाले, “ही माझी शिकार आहे”

Abhinandan 300x200

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पाकिस्तानच्या तावडीत सापडलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान शुक्रवारी रात्री सुखरूपरीत्या मायभूमीत परतले आहेत. दरम्यान, भारतीय लष्करी तळांवर हल्ला करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी लढाऊ विमानांना हुसकावून लावतान अभिनंदन यांनी दाखवलेल्या शौर्याची आणखी एक कथा समोर आली आहे. मिग-२१ विमान घेऊन मोहिमेवर निघालेल्या विंग कमांडर अभिनंदन यांनी समोर पाकिस्तानी एफ-१६ विमान दिसताच ही माझी शिकार आहे, असा संदेश सहकाऱ्यांना दिला आणि पुढच्या ८६ सेकंदात त्या विमानाच्या ठिकऱ्या उडवल्या, अशी माहिती आता समोर आली आहे.

 

 

सविस्तर हकिकत अशी, पाकिस्तानच्या अत्याधुनिक एफ-१६ विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केल्यावर भारताच्या हवाई दलाची विमाने हवेत झेपावली. बघता बघता नौशेरा विभागातील आकाशात भारत आणि पाकिस्तानच्या विमानांमध्ये चकमक सुरू झाली. कुरघोडी आणि हुलकावण्यांचे खेळ सुरू झाले. याला हवाई युद्धाच्या भाषेत डॉग फाइट म्हटले जाते. मिग-२१ विमान उडवत असलेल्या अभिनंदन यांनी १५ हजार फूट उंचीवर असताना पाकिस्तानचे एफ-१६ विमान पाहिले. ते विमान तेव्हा आठ हजार फूट उंचीवर होते. एकमेकांना झुकांड्या देण्याचा खेळ २६ हजार फूट उंचीपर्यंत पोहोचला. त्याचवेळी विंग कमांडर अभिनंदन यांनी एफ-१६ विमानावर आर-७३ क्षेपणास्त्र डागले. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या एफ-१६ विमानाच्या वैमानिकाने उच्च क्षमतेचा फायदा घेत मिग-२१ विमानावर प्रतिवार केला. या चकमकीत दोन्ही विमाने कोसळली. सुदैवाने अभिनंदन हे प्रसंगावधान राखून विमानातून बाहेर पडले. मात्र हवेच्या झोतामुळे त्यांचे पॅराशूट पाकव्याप्त काश्मीरमध्ये पोहोचल्याने. ते पाकिस्तानी सैन्याच्या तावडीत सापडले. दरम्यान, विंग कमांडर वर्धमान हे तीन दिवसांनंतर पाकिस्तानातून भारतात परतले.

Exit mobile version