Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगाव-धुळे मार्गावर टँकरमधून गॅस गळती : वाहतूक खोळंबली

gas tanker

चाळीसगाव , प्रतिनिधी | चाळीसगाव-धुळे मार्गावर आज दुपारी एका गॅस टँकरमधून गॅस गळती होत असून ह्या टँकरला रस्त्यावर थांबवण्यात आले असून दोन्हीकडील वाहतूक रोखून ठेवण्यात आली आहे.

 

अधिक माहिती अशी की, यामार्गावर मेहुनबारे ते खडकी दरम्यान आज दुपारी ही घटना घडली. घटनास्थळी मेहुणबारे येथील पोलिसांचे पथक ए.पी.आय. बेंद्रे यांच्या नेतृत्वाखाली दाखल झाले असून त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून दोन्हीकडील वाहतूक रोखून धरली आहे. तसेच चाळीसगाव येथून अग्निशमन दलाचे दोन बंबही घटनास्थळी हजर झाले असून गॅस गळती बंद करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत.

Exit mobile version