Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमळनेर तालुक्याचे प्रा. शशिकांत पाटील यांची पुरस्कार समितीवर निवड

अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील मूडी प्र. डांगरी येथील रहिवासी आणि कोकणातील खालापूर येथील विश्वनिकेतन अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक शास्त्र व अभियांत्रिकी विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक व विभागप्रमुख प्रा. शशिकांत पाटील यांची आय ट्रिपल ई अंतर्गत अँटेना सोसायटीच्या फील्ड पुरस्काराच्या तदर्थ नामांकन समितीवर तज्ञ सदस्य म्हणून निवड झाली आहे.

आय ट्रिपल ई या जागतिक दर्जाच्या व प्रथितयश संस्थेच्या ३९ सोसायटीज असून असून दूरसंचार क्षेत्रातील अग्रगण्य व नामांकित  ऍंटेना व प्रोपेगेशन सोसायटीची स्थापना १९४९ साली झाली असून हि संस्था सुमारे ४० देशांत दळवळण माहिती तंत्रज्ञान व दूरसंचार क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावत असून हजारो प्राध्यापक, विद्यार्थी, संशोधक, तज्ज्ञ मार्गदर्शक, अभियंते सदस्य असून अविरतपणे संशोधन क्षेत्रात भरीव योगदान करीत आहेत. संस्थेतर्फे अँटेना व दूरसंचार क्षेत्रात जागतिक कीर्तीचे योगदान देणाऱ्याना दरवर्षी पुरस्कार प्रदान करण्यात येतात. पुरस्कारासाठी जगभरातून नामांकन आमंत्रित केले जातात किंवा या क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच ज्येष्ठ सदस्यांतर्फे नामनिर्देशित केले जातात. त्यासाठी तात्कालिक किंवा तदर्थ नामांकन समिती गठीत करण्यात येते आणि तज्ज्ञ मार्गदर्शक यांच्या साहाय्याने पुरस्कार समिती संयोजनाचे काम करीत असते.

यावर्षीच्या समितीत कॅनडा येथील प्रा. अब्देल सेबाक यांची चेअर म्हणून निवड करण्यात अली असून अजून ५ सदस्यांची निवड करण्यात आली आहे. या समितीत अमेरिकेचे २, इटली व इंग्लंड येथील प्रत्येकी १ व प्रा. शशिकांत पाटील हे आशिया विभागातून एकमेव सदस्य आहेत. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. प्रा. शशिकांत पाटील हे अमळनेर येथील सेवानिवृत्त कलाशिक्षक एस. बी. पाटील यांचे चिरंजीव असून दिव्यमराठीचे ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत पाटील यांचे लहान बंधू आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र स्वागत होत आहे.

 

Exit mobile version