Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अखेर आर्यन खानची ऑर्थर रोड तुरूंगातून मुक्तता

मुंबई प्रतिनिधी | क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणी कारागृहात असणारा सुपरस्टार शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याची जामीनाच्या प्रक्रियेची पूर्तता केल्यानंतर आज ऑर्थर रोड कारागृहातून मुक्तता करण्यात आली आहे.

क्रूझवरील पार्टीत अंमल पदार्थाचा उपयोग केल्याचे प्रकरण सध्या खूप गाजत आहे. यात शाहरूखचा मुलगा आर्यन खान याच्यासह अन्य वलयांकीत मंडळी आढळून आल्याने याला मोठी प्रसिध्दी मिळाली. यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी देखील झडल्या. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच आर्यनला जामीन मिळाला असून काल संपूर्ण दिवसभरात जामीनाची कागदोपत्री पूर्तता करण्यात आली. अभिनेत्री जुही चावला ही आर्यनला जामीनदार झाली आहे.

दरम्यान, आज सकाळी नऊ वाजेपासून आर्यनच्या मुक्ततेची प्रक्रिया सुरू झाली. शाहरूख खानची रेंजरोव्हर कार ऑर्थर रोड कारागृहाबाहेर दाखल झाली. यात शाहरूख असेल असे मानले जात होते. यामुळे त्याची एक झलक पाहण्यासाठी परिसरात मोठी गर्दी जमली.

यानंतर संपूर्ण प्रकियेची पूर्तता झाल्यानंतर सकाळी सुमारे अकराच्या सुमारास आर्यनची ऑर्थर रोड कारागृहातून मुक्तता झाली.

Exit mobile version