Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धुळे येथून आणलेल्या अखंड ज्योतीचे पारोळ्यात आगमन

akhand jyot

पारोळा, प्रतिनिधी | धुळे येथील एकवीरा देवी मंदिरातून आज (दि.२९) येथे अखंड ज्योत आणण्यात आली. येथील मुजुमदार कॉलनीतील अष्टभूजा जयवीर दुर्गा मित्र मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी धुळे येथील जगत जननी एकवीरा मातेच्या मंदिरात जळणारी अखंड ज्योत आणली जाते. या मंडळाच्या वतीने दरवर्षी नवरात्रीसाठी अखंड ज्योत आणण्याचा उपक्रम पारंपरिक पद्धतीने व मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

 

या मंडळातील सर्व पदाधिकारी भक्त जवळपास ४० किलोमीटर पायी जाऊन धुळे येथून वाजत-गाजत व दुर्गा मातेच्या जयघोषात अखंड ज्योत आणत असतात. या अखंड ज्योत मिरवणुकीत मंडळाचे अध्यक्ष प्रवीण चौधरी, राजेश चौधरी, गणेश चौधरी, विकी चौधरी, सागर चौधरी, विनोद चौधरी, सोनू चौधरी, मयूर चौधरी, शांताराम चौधरी, जगदीश चौधरी, चौधरी सोनू, पुष्पक, गौरव, जयश, मंथन, गिरीश व कल्पेश यांच्यासह अन्य भाविक सहभागी झाले होते.

Exit mobile version