Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोयता व चॉपर घेवून फिरणाऱ्या तिघांना अटक; शनीपेठ पोलीसांची कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शनीपेठ पोलीस ठाण्याच्या चौक परिसरात तीन जण दुचाकीवर बसून हातात कोयता आणि चॉपर घेवून दहशत माजवित असतांना  शनीपेठ पोलीसांनी कारवाई करत अटक केली आहे. ही कारवाई रविवारी ३१ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता केली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  शनिपेठ पोलिस चौकी परिसरात गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने तीन जण घातक हत्यारे घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यावेळी शनिपेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले असता दुचाकीवरून जाणारे विशाल अशोक पाटील (वय-२८, रा. चौगुले प्लॉट), निर्मल नंदू अहिरे (वय-२३, रा. मेस्कोमाता नगर) आणि सतीश शालिक सैंदाणे (वय-२९, रा. वाल्मीक नगर) यांच्याकडे धारदार कोयता व चॉपर आढळून आला. हे हत्यारे पोलिसांनी जप्त केली.  य प्रकरणी पोकॉ राहुल पाटील यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ परिष जाधव करीत आहेत.

Exit mobile version