Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कंपनीतून तांब्याच्या पट्ट्यांची चोरी करणाऱ्यास अटक; मुद्देमाल हस्तगत

जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसीतील एका कंपनीतून सुमारे अडीच लाख रूपये किंमतीची तांब्याच्या पट्ट्यांसह पितळी कॉईल चोरून नेतांना आढळून आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, एमआयडीसीतील सेक्टर सी मधील स्पेक्ट्रम इलेक्ट्रिक इंडस्ट्रिज कंपनीत ईलेक्ट्रिक वायर बनते. २० जून रोजी रात्री ८ ते ९ वाजेच्या सुमारास सिक्यूरीटी भुषण प्रकाश कोळी (वय-२४) रा. मेहरूण हा कामाला आहे. २० जून रोजी सायंकाळी कामवार असतांना (एमएच १९ सीवाय ३७०) क्रमांकाची रिकामी गाडी स्टेअर सुपरवायझर जीवन चौधरी यांनी आतमध्ये पाठविण्यास सांगितले. त्यानुसार रिक्षाचालक दिपक यशवंत चौधरी (वय-३८) रा. टहाकळी ता. धरणगाव ह.मु. जळगाव हा रिक्षा आत घेवून गेला. दरम्यान, रात्री ९.२० वाजेच्या सुमारास रिक्षा परत गेटकडे आले. सिक्यूरिटी भूषण कोळी वाहन चेक करत असतांना सुपरवायझर जीवन चौधरी आणि हितेश कोल्हे सोबत आले व म्हणाले की “तु कशाला गाडी अडवतो तीला जावू दे” असे म्हटल्यावर वाहन चेक केले असता त्यात सुमारे २ लाख ४० हजार रूपये किंमतीचे तांब्याच्या पट्ट्या आणि १२ हजार रूपये किंमतीचे पितळी कॉईल असा एकुण २ लाख ५२ हजार रूपये किंमतीचा माल चोरून नेतांना आढळून आला. सुरक्षा रक्षकाच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात सुपरवायझर जीवन चौधरी, हितेश कोल्हे आणि रिक्षा चालक दिपक यशवंत चौधरी या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात रिक्षा चालकाला पोलीसांनी अटक केली असून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Exit mobile version