Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शाळकरी विद्यार्थींनीकडे पाहून अश्लिल हातवारे करून विनयभंग करणाऱ्याला अटक

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील एका अल्पवयीन शाळकरी १२ वर्षीय विद्यार्थींनीकडे पाहून अर्धनग्न होवून अश्लिल हातवारे करून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी यावल पोलीसात गुन्हा दखल करण्यात आला असून संशयिताला अटक करण्यात आली आहे.

 

यावल तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन शाळकरी मुलीला त्यांच्या घराशेजारीच राहणाऱ्या एका वयोवृद्ध व्यक्तीने शाळेतून घरी जात असलेल्या मुलीकडे पाहून अश्लिल हातवारे करून विनयभंग केला. पिडीत मुलीने हा प्रकार  आपल्या आई,बाबा यांना सांगीतले.

 

मुलीने यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून वयोवृद्ध व्यक्ती विरुद्ध लैंगीक गुन्ह्यापासुन बालकांचे सरंक्षण कायदा २०१२पॉस्कोअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक सुनिल मोरे , महिला पोलिस कर्मचारी सारीका वाणी व पोलिस करीत आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयिताला अटक करण्यात आली आहे.

Exit mobile version