Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संस्थेतील शिक्षकाला अधिसंख्य करणे भोवले : डॉ नंदकिशोर जोशी यांच्याविरुद्ध अटक वॉरंट

छत्रपती संभाजी महाराज नगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नियमबाह्यरित्या संस्थेतील शिक्षकाला अधिसंख्य पदावर नियुक्तीची नोटीस दिल्याने डॉ नंदकिशोर त्रिविकिरण जोशी, अध्यक्ष छत्रपती शिक्षण मंडळ ,कल्याण जिल्हा ठाणे यांच्या विरोधात न्यायालयाने जामीनपात्र अटक वॉरंट जारी केल्याने शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की सुनील कडू कोळी हे छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण येथील माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून नोकरीस आहेत. त्यांच्या जातपडताळणी प्रस्ताव न्यायप्रविष्ट आहे व जातपडताळणी समितीच्या आदेशास न्यायालयाची स्थगिती आहे असे असतांना संबधीत शिक्षक सुनील कडू कोळी यांना अधिसंख्य पदावर नियुक्ती पत्र संबधीत संस्था प्रमुख डॉ नंदकिशोर जोशी व श्रीमती ललिता दहीगुले माध्यमिक शिक्षणाधिकारी ठाणे यांनी दिले.

सदर नियुक्ती पत्रा विरोधात सुनील कडू कोळी यांनी ऍड मोहनिश थोरात यांच्या मार्फत मा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात डॉ नंदकिशोर जोशी, डॉ निलेश शंकर रेवगडे, ज्ञान मंदिर हायस्कुल कल्याण (पश्चिम) व श्रीमती ललित दहितुले, माध्यमिक शिक्षणाधिकारी,ठाणे यांच्या विरुध्द अवमान याचिका दाखल केली होती सदर याचिकेच्या सुनावणीच्या वेळी ऍड थोरात यांनी शासन निर्णय २१/१२/२०१९ चा चुकीचा अर्थ छत्रपती शिक्षण मंडळाने लावल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणुन दिले सदर सुनावणीत श्रीमती ललिता दहितुले, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी लेखी दिलगिरी व्यक्त केल्याने त्यांच्यवरील कारवाई टळली पण सम्बधित संस्थाप्रमुख डॉ नंदकिशोर जोशी हे न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहत नसल्याने न्यायालयाने त्यांच्या विरोधात जामीनपात्र अटक वॉरंट न्यायालयाने बजावले आहे.

सदर आदेशामुळे २१ डिसेंबर २०१९ च्या शासन निर्णयाचा चुकीचा अर्थ लावून अनुसूचित जमातीच्या कर्मचार्‍यांना अधिसंख्य करणार्‍यांना चाप बसणार आहे.

Exit mobile version