एरंडोल नगरपालिकेतर्फे शहरात चार ठिकाणी गणपती मुर्ती संकलनाची व्यवस्था

एरंडोल प्रतिनिधी ।   स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वसुंधरा अभियानांतर्गत एरंडोल नगरपरिषदेच्या वतीने सार्वजनिक गणपती व घरगुती गणपती विसर्जनासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी शहरात चार ठिकाणी गणपती मुर्ती संकलन व निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती एरंडोल नगरपरिषदेच्या वतीने देण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, कोरोना पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या निर्बंधामुळे विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी नागरीकांच्या सोयीसाठी १९ सप्टेंबर रेाजी एरंडोल नगरपरिषदेतर्फे शहरात चार ठिकाणी गणपती मूर्ती संकलन व निर्माल्य संकलनासाठी म्हसावद नाका, कासोदा गेट, जुने पद्मालय तलाव आणि मरिमाता चौक येथे व्यवस्था करण्यात आली आहे.  स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वसुंधरा अभियानांतर्गत एरंडोल नगरपरिषदेच्या वतीने ही व्यवस्था करण्यात आली आहे. तरी नागरीकांना दिलेल्या ठिकाणी गणपती संकलन आणि निर्माल्य संकलनाचा लाभ घ्यावा असे आवाहन एरंडोल नगरपरिषदेतर्फे करण्यात आले आहे.

Protected Content