Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अर्धवट शिजलेल्या अंडी वाटप प्रकरणी उपसभापतींची पाहणी

 

यावल प्रतिनिधी | तालुक्यातील जामुनझीरा येथे अर्धवट शिजलेले अंडी प्रकरणी आज पंचायत समितीचे उप सभापती योगेश भंगाळे यांनी गावाला जावुन परिस्थितीची पाहणी करून आदिवासींच्या समस्या जाणून घेतल्या.

.दरम्यान या संदर्भात यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या जामुनझीरा या आदीवासी वस्तीवर एकात्मीक महीला व बालविकास विभागाच्या माध्यमातुन डॉ एपीजे अब्दुल कलाम अमृत पोषण आहार योजनेअंतर्गत ६ महीने ते ६ वर्ष वयोगटातील बाळांना व गरोदर मातांना विविध पौष्टीक आहार आंगणवाडी सेविकेंच्या हस्ते पुरविण्यात येत असते असे ,दरम्यान काल दिनांक ३ सप्टेंबर रोजी जामुनझीरा येथील सेविका अंतीबाई प्यारसिंग बारेला म्हणुन कार्य करीत असलेल्या जामुनझीरा गावात आंगवाडी सेविकेने बाळांना अर्धवट शिजवलेले बॉईल अंडी वाटप केल्याने गावातील संतत्प आदीवासी बांधवांनी यावल येथील एकात्मीक महीला व बालविकास कार्यालयाच्या प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे यांची भेट घेवुन या संदर्भात तक्रार दिली असुन , या अनुषंगा पंचायत समितीचे उपसभापती योगेश दिलीप भंगाळे यांनी आज दिनांक ४ सप्टेंबर रोजी सकाळी जामुनझीरा या आदीवासी गावाला भेट दिली व आदीवासी बांधवांच्या समस्या व अडचणी जाणुन घेतल्या , या वेळी त्यांच्या सोबत एकात्मिक महीला व बालविकास कार्यालयाच्या सौखेडा सिम विभागाच्या पर्यवेक्षिका पी एस पाटील , मोहराळा येथील सामाजीक कार्यकर्ते लहु रामभाऊ पाटील गावातील पोलीस पाटील हिरा पावरा , बिलारसिंग पावरा हे सोबत होते, यावेळी सदरच्या आंगणवाडी सेविका अंतीबाई बारेला यांच्या विरूध्द करण्यात आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांच्या कड्डन पोषण आहार वितरणाची जबाबदारी तात्पुरत्या स्वरूपात काढुन घेण्यात आली असुन , नसीमा तडवी यांच्याकडे पोषण आहार वाटपाची जबाबदारी देण्यात आली असल्याची माहीती पर्यवेक्षिका पी एस पाटील यांनी दिली .

 

 

Exit mobile version