Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आर्किड इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक-पालक सभा

चोपडा प्रतिनिधी । येथील यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट संचालित ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल येथे ओपन हाऊस कार्यक्रमांतर्गत शिक्षक-पालक सभा घेण्यात आली.

यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. राहुल पाटिल तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचा प्राचार्या मिस परमेश्‍वरी , पालक प्रतिनिधी पंकज पाटील सौ. सुवर्णा लवटे आदी उपस्थित होते. प्राचार्या मिस परमेश्‍वरी यांनी शाळेच्या उपक्रमांबाबत पालकांशी संवाद साधला. अध्यक्ष या नात्याने डॉ. राहुल पाटील यांनी उपस्थित सर्व पालकांना आजच्या काळात विद्यार्थी व पालक यांचे नाते कशा प्रमाणे असायला हवे , पालकांच्या जबाबदार्‍या काय याविषयी मार्गदर्शन केले. तसेच आपल्या शरीराला पाण्याची किती गरज असते तसेच शाळेत जेवणाची घंटा असते त्या प्रमाणे पाण्याची सुद्धा घंटा असावी जेणे करून विद्यार्थ्यांची शरिरातील पाण्याची गरज पूर्ण होण्यास मदत होईल. यासाठी पालक प्रतिनिधी म्हणून यशवंत पाटील यांनी घंटा वाजवून पाणी घंटेचे लोकार्पण केले. तिसरीच्या विद्यार्थ्यांनी मोबाईल वापराचे दुष्परिणाम या विषयावर छोटी नाटिका सादर केली. सूत्रसंचालन नितेश वाघ तर आभार प्रदर्शन दिपाली पाटील यांनी केले याप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version