Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

घरकुल योजना मंजूर करा; आदीवासी बांधवांचे उपोषण

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आदिवासी रहीवाशांना घरकुल मिळावे यासाठी यावल पंचायत समितीच्या आवारात आमरण उपोषणाला तालुक्यातील चुंचाळे येथील आदीवासी बांधवांनी सुरूवात केली आहे. विविध मागण्यांचे निवेदन यावल पंचायत समितीला देण्यात आले.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील चुंचाळे येथील गायरान येथील आदिवासी बांधव हे गेल्या ३५ वर्षांपासून रहिवास आहे. या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा, आंगणवाडी, विहीर, ट्युबवेल आदी सुविधा शासनाकडून देण्यात आले आहे. चुंचाळे येथील आदीवासी बांधवांचा कायमचा आधिवास आहे. त्यामुळे आदीवासी बांधवांना हक्काचे घरकुल मिळावे यासाइी अनेकवेळा यावल पंचायत समितीला निवेदन देण्यात आले आहे. परंतून अद्यापपर्यंत कोणतेही घरकुल मंजूर झालेले नाही. त्यामुळे मंगळवारी ५ जूलै रोजी सकाळी ११ वाजता चुंचाळे येथील आदीवासी बांधवांनी यावल पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे. आदीवासी बांधवांना न्याय मिळेपर्यंत उपोषण सोडणार नाही असा इशारा दिला आहे.

 

या उपोषणात राम बारेला, तुफान बारेला, भुवानसिंग बारेला, सुनिल बारेला, वाहऱ्या बारेला, काशीराम बारेला, अर्जुन बारेला, मोहन बारेला, शंकर बारेला, सुनिल बारेला, रेवलसिंग बारेला, भरत बारेला, बानल्या बारेला, दिनेश बारेला, मुकेश बारेला, काना बारेला, भावलाल बारेला, मटरू बारेला, दुमना बारेला यांच्यासह आदी आदीवासी बांधवांनी उपोषणात सहभाग नोंदविला.

Exit mobile version