Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फैजपूर पालिकेत विविध विषयांना मंजुरी

faizpur

फैजपुर, प्रतिनिधी | शहराची हद्दवाढ झालेल्या भागात रस्ते, गटारी, अत्याआवश्यक नागरी सुविधा व विकास कामे करण्यासाठी शासनाकडे पालिकेमार्फत (डी.पी. आर)विस्तृत प्रकल्प तयार करून हद्दवाढ झालेल्या भागांसाठी शासनाकडून निधी मिळावा यासह तीन महत्वपुर्ण विषयांवर शुक्रवारी चर्चा करून फैजपूर पालिकेच्या सभेत मंजुरी देण्यात आली.
.

फैजपुर पालिकेच्या विशेष साधारण सभेचे आयोजन शुक्रवारी दि १५ रोजी सकाळी ११ वाजता पालिका सभागृहात प्रभारी नगराध्यक्ष रशीद तडवी यांचे अध्यक्षतेख़ाली करण्यात आले. विषय पत्रिकेवर चर्चेसाठी चार विषय होते. यावेळी  मुख्याधिकारी किशोर चव्हाण व्यासपिठावर उपस्थित होते. तत्पूर्वी सभेत बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त प्रतिमा पूजन करून सभेला सुरुवात करण्यात आली. सन २०१९-२० ते २०२३-२४ या पंचवार्षिक रीव्हिजन माहे डिसेंबर २०१९ पावतो मुदतवाढ मागणीसाठी  जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविण्यास मंजुरी देणेबाबत विचार करणे. फैजपुर शहरातील मालमत्तावा सन २०१९-२० ते २०२३-२४ पंचवार्षिक पर्नमल्यांकनासाठी व वार्षिक आकारणीकामी गुणांक (दर) ठरविणेबाबत विचार विनिमय करणे हे विषय ठेवण्यात आले होते. हे दोन्ही विषयी सभागृहात भाजपा गटनेते मिलिंद वाघूळदे यांनी सध्या दुष्काळ ग्रस्त परिस्थिती असल्याने पंचवार्षिक रिव्हीजन व पंचवार्षिक पुर्नमल्यांकनासाठी व वार्षिक आकारणी गुणाक दरवाढ यांना शासनाने मुदत वाढ करून द्यावी असा ठराव करून शासनाकडे पाठवण्यात येईल असे सूचविले. याला सर्व नगरसेवक यांनी सहमती दिली. तर फैजपुर शहराची हद्दवाढ झालेल्या भागात रस्ते, गटारी, पाण्याची पाइप लाईन करणे, लाईट आदी विकास कामे घेण्यासाठी डी.पी.आर तयार करून शासनाने या भागासाठी निधी देण्यात यावा असे तीन विषयांवर विचारविनिमय करून मंजुरी देण्यात आली. यावेळी सभेला भाजपा गटनेते मिलींद वाघुळदे, नगरसेवक हेमराज चौधरी, काँग्रेस गटनेते कलीम खां मन्यार, राष्ट्रवादी गटनेते शेख कुर्बान यांचेसह नगरसेवक नगरसेविका उपस्थित होत्या. सभेचे कामकाज सहाय्यक कार्यालय निरीक्षक संतोष वाणी, कर निरीक्षक बाजीराव नवले, सभा लिपिक सुधीर चौधरी, मनोहर चौधरी यांनी काम पाहिले.

Exit mobile version