Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्य सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला राज्य सरकारने आज अखेर मंजुरी दिली असून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नामांतर करण्यात आले असून राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. आता औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशीव असे नामकरण करण्यात आले आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून माहिती दिली. तसेच त्यांनी केंद्र सरकारच्या मंजुरीचे पत्रही ट्विट केले आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी घेतलेला औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा निर्णय अयोग्य असल्याचे म्हणत शिंदे सरकारने पुन्हा आपल्या कॅबिनेटमध्ये शहराच्या नामांतराचा निर्णय घेतला. राज्य सरकारने या दोन शहरांचा नामांतराचा निर्णय घेतला व हा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला. त्यानंतर काही महिन्यातच या प्रस्तावाला केंद्राने मंजुरी दिली आहे. यामुळे आता या दोन्ही शहरांच्या नामांतराला मंजुरी मिळाली आहे.

Exit mobile version