Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाजपा व्यापारी आघाडीच्या जिल्हा संयोजकपदी स्वप्निल देवरे यांची नियुक्ती

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील सोने चांदीचे व्यापारी स्वप्निल रवींद्र देवरे यांची भाजपा व्यापारी आघाडी जळगाव जिल्हा सहसंयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ही निवड भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांच्या सूचनेवरून व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष उमेश कासट यांनी केली आहे. सदरचे नियुक्ती पत्र त्यांना प्राप्त झाले आहे. यावल येथील सोन्या-चांदीचे व्यापारी तथा सराफा व्यवसायीक स्वप्निल देवरे यांची भाजपा व्यापारी आघाडीच्या जिल्हा सहसंयोजक पदावर झालेल्या निवडीबद्दल त्यांचे यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हर्षल पाटील, भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, व्यापारी आघाडीचे मनोज बियाणी, भारतीय जनता पक्षाच्या सहकार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष राकेश फेगडे,राकेश पाटील,परीक्षीत बऱ्हाटे,अतिष झाल्टे,हरलाल कोळी सह आदींनी त्यांच्या निवडीचे स्वागत करीत अभिनंदन केले आहे.

Exit mobile version