Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाजपा एरंडोल शहर अध्यक्षपदी सुनील चौधरी यांची नियुक्ती

एरंडोल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील सुनील चौधरी यांची भाजपा शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

त्यांनी युवा मोर्चाच्या शहराध्यक्षपदी असताना पक्ष संघटन मजबूत केले व पक्ष वाढीसाठी विविध उपक्रम राबविले. त्या कामाची दखल घेऊन त्यांना शहराध्यक्ष पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.

सुनील चौधरी यांच्या नियुक्तीबद्दल ना.गिरीश महाजन, भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे, खासदार उन्मेश पाटील, ॲड किशोर काळकर, मधु काटे, सचिन पानपाटील यांनी अभिनंदन केले आहे.

Exit mobile version