Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पंकजा व तावडेंवर राज्य प्रभारीपदांची जबाबदारी

मुंबई प्रतिनिधी । माजी मंत्री पंकजा मुंडे व विनोद तावडे यांच्यावर राज्य प्रभारीपदांची जबाबदारी टाकून भाजन नेतृत्वाने त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

भाजपाने शुक्रवारी रात्री विविध राज्यांचे प्रभारी आणि सह प्रभारी नियुक्त केले असून यामध्ये पंकजा मुंडे, विनोद तावडे यांची नावे आहेत. या यादीमध्ये पंकजा यांची मध्य प्रदेश सह प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर विनोद तावडे यांची हरियाणा प्रदेश भाजप प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

यासोबत महाराष्ट्रातील अन्य नेत्यांनाही प्रभारी बनविण्यात आले आहे. यात सुनील देवधर यांची आंध्रप्रदेश सह प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर विजया रहाटकर यांची दमन दीव – दादरा – नगर हवेली प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. कैलाश विजयवर्गीय यांना पुन्हा एकदा पश्‍चिम बंगालचे प्रभारी बनविण्यात आले आहे. पुढील वर्षी तेथे विधानसभा निवडणूकही होणार असल्याने ही निवड महत्वपूर्ण मानली जात आहे. तर, भूपेंद्र यादव यांना पुन्हा बिहार आणि गुजरातचा प्रभारी बनविण्यात आले आहे.

पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांना मणिपूरची जबाबदारी देण्यात आली आहे. तर महासचिव मुरलीधर राव यांना मध्य प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे. राधामोहन सिंह उत्तर प्रदेश, नलीन कोहली नागालँड, अरुण सिंह पंजाब, विनोद सोनकर यांना त्रिपुराची जबाबदारी देण्यात आली आहे. तर भाजपाचे माजी महासचिव राम माधव यांच्यासह महासचिव अनिल जैन आणि सरोज पांडे यांनादेखील कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही.

Exit mobile version