Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महासंघाच्या अध्यक्षपदी जे.के.पाटील यांची नियुक्ती

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील ज्योती विद्या मंदीर शाळेचे मुख्याध्यापक जे.के.पाटील यांनी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महासंघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तालुका मुख्याध्यापक संघातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी ग.स.सोसायटीचे अध्यक्ष तुकाराम बोरोले हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महासंघ सदस्य जी.आर.चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष बाळु पाटील, सहसचिव एस.पी. भिरुड, रावेरचे अध्यक्ष ललित चौधरी, ए.आर.धनपाल, यावल तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जयंत चौधरी, सचिव निशा पाटील, मुख्याध्यापक  एस.बी.सरोदे, संघाचे सदस्य डी.व्ही.पाटील, एस.बी.बोठे, गिरीश पाटील, अश्पाक शेख, शावखा तडवी, उमाकांत महाजन, टी.डी चोपडे, एस.बी.सोनवणे, भुसावळ माध्यमिक पतपेढीचे अध्यक्ष एल.आर.सुपे, संचालक दीपक बारी, तालुका मुख्याध्यापक संघाचे सदस्य, सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. 

यावेळी जे.के.पाटील यांनी मार्गदर्शन करताना असे सांगितले की, मी खेड्यापासून कामाची सुरुवात केली व राज्य महासंघाचा अध्यक्ष झालो यासाठी एकाच मंत्राचा वापर केला तो म्हणजे वाचलं तर टिकाल तसेच सर्वांच्या  समस्या सोडविण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील रहाल तर यश नक्की मिळते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक यावल तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जयंत चौधरी यांनी सांगितले की,आपल्या जिल्ह्यासाठी राज्य अध्यक्ष पद मिळणे ही अभिमानाची बाब आहे.

सूत्रसंचालन मनिषा भटकर,आभार  गणेश गुरव यांनी मानले. अध्यक्षीय भाषणात तुकाराम बोरोले यांनी सांगितले की,जे .के.पाटील हे स्वतःच्या कर्तृत्वाने एवढ्या मोठ्या पदावर पोहचले आहे. ते सर्वांसाठी मुख्याध्यापक २४ तास असुन अतिशय अभ्यासु व्यक्तिमत्त्व आहे.मनोगत डी.व्ही.पाटील तर आभार गणेश गुरव यांनी मानले. तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यावल तालुका मुख्याध्यापक संघाची  कार्यकारणी व  विद्यालयाचे  मुख्याध्यापक,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version