Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लोकसभा निवडणुकीसाठी खर्च निरीक्षकांची नियुक्ती !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता भारत निवडणूक आयोगाने उमेदवार खर्च नियंत्रणासाठी जळगाव लोकसभा मतदारसंघा करिता निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून भारतीय महसूल सेवेतील अधिकारी कुमार चंदन यांची नियुक्ती केली आहे. तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय महसूल सेवेतील अधिकारी संदीपन खान यांची नियुक्ती केली आहे.

निवडणूक खर्च निरीक्षक कुमार चंदन यांचे 18 एप्रिल रोजी जळगांव लोकसभा मतदार संघात व संदीपन खान यांचे रावेर मतदार संघात आगमन झाले आहे.श्री कुमार चंदन हे जळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवणार आहेत.त्यांचा निवास अभंग अजिंठा शासकीय विश्रामगृह जळगाव येथे राहणार असून त्यांचे कार्यालय राजगड अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे असणार आहे.तर श्री.चंदन यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 8275970670 हा आहे. तर संदीपन खान हे रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवणार आहे. श्री. खान यांचा निवास पोवाडा अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे असणार आहे. तर त्यांचे कार्यालय राजगड अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे असणार आहे. श्री.खान यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 8275970671 हा आहे.निवडणूक निरीक्षक यांच्याशी दिलेल्या भ्रमणध्वनीवर अथवा कार्यालयीन पत्त्यावर संपर्क साधता येईल असे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांनी कळविले आहे.

Exit mobile version