नशिराबाद नगरपरिषदेत पुर्णवेळ प्रशासक नेमावा; नशिराबादकरांचे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांना निवेदन

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद गावात विविध समस्या सोडविण्यासाठी तातडीने प्रशासक नेमावा अशी मागणीचे निवेदन आज ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता नशिराबाद नागरीकांनी निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांना देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद या ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपरिषदेमध्ये झाले. कोरोना प्रादुर्भावामुळे निवडणुका लांबणीवर असल्याने प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. पूर्णवेळ प्रशासक नसल्यामुळे गावातील समस्या सोडवण्यासाठी अडचणी येत आहे. पावसाळा सुरू असल्यामुळे गावातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गावात प्रवेश होणाऱ्या प्रमुख दोन रस्त्यांसह गावातील वार्डा मधील रस्त्यांवर खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे परिणामी अपघाताचा धोका आहे. गटारींची अस्वच्छता वाढत आहे. साथीचे आजारांचे  रुग्ण वाढत आहेत. पावसामुळे पाण्याचे डबके साचले आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून डेंगूसह अन्य आजार फोफावत आहे. बसस्थानक चौकातील बसस्थानक चौकातील हायमस्ट लॅम्पसह मधील गावात अनेक ठिकाणी पथदीप बंद आहे. समस्या मांडाव्या तरी कोणाकडे असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे गावाचा विकास खुंटलेला आहे मूलभूत समस्या सोडविण्यासाठी पूर्ण वेळ प्रशासक मिळावा, ही नाशिराबादकर जनतेची मागणी आहे. या मागणीचे निवेदन आज ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांना देण्यात आले. या निवेदनावर स्वयम् शोध फाउंडेशन अध्यक्ष योगेश कोलते, नरेंद्र धर्माधिकारी, प्रा. विश्वनाथ महाजन, नीरज चीतोडे, अंशुल पिंगळे, सौरभ चौधरी, अक्षय वाणी, तेजस बारूदवाले, सागर मोरे हे उपस्थित होते.

 

Protected Content