Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विद्यापीठीय परीक्षांचे फॉर्म ऑनलाईन भरण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन

यावल प्रतिनिधी । येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील तीनही शाखेच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठीय परीक्षांचे अर्ज ऑनलाई भरण्यास सुरूवात झाली असून मुदत संपण्याच्या आत परिक्षेचे अर्ज सादर करण्याचे आवाहन महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे.

परीक्षा फॉर्म हा मोबाईल किंवा कॅफेवर जाऊन भरणे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात येण्याची आवश्यकता नाही. परीक्षा फॉर्म भरण्याची शेवटची मुदत दिनांक 12 /5 /2021 पर्यंतच आहे. परीक्षा फॉर्म भरणे अनिवार्य आहे .परीक्षा फॉर्म भरताना आपण घेतलेले विषय बरोबर आहेत किंवा नाहीत ते तपासून परीक्षा फॉर्म भरणे. मुदतीत परीक्षा फॉर्म भरला नाही तर लेट फी लागेल.

सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या http://www.nmuj.digitaluniversity.ac  या वेबसाइटवर परीक्षेचे फॉर्म भरायचे आहे. जे विद्यार्थी या वेबसाईटवर परीक्षेचे फॉर्म भरतील. तेच विद्यार्थी परीक्षेला पात्र ठरतील.  याची महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

तसेच वरील दिलेल्या वेबसाईटवरच दिनांक 8 जून 2021पासून तुमची परीक्षा  ऑनलाईन पद्धतीने सुरू राहील याची देखील नोंद घ्यावी.

परीक्षा फॉर्म भरताना अडचण असेल तर प्रा.ईश्वर पाटील सर यांच्याशी संपर्क करणे. याची नोंद सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावी. असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version