Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पोटॅशयुक्त खतांच्या वापराबाबत शेतकऱ्यांना आवाहन

sambhaji thakur

sambhaji thakur

जळगाव  लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकाचे उत्पादन वाढीसह टिकवण्याची क्षमता वाढविण्यासाठी पोटॅशयुक्त खतांचा वापर मात्रा नुसार करावा. असं जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी आज पत्रकारांशी बोलतांना शेतकऱ्यांना आवाहन केलं.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज शुक्रवार, दि. ५ ऑगस्ट रोजी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर पत्रकारांशी बोलतांना म्हणाले की, “पोटॅश म्हणजेच पालाश युक्त खते ही पिकांसाठी उपयुक्त खते आहेत. पोटॅश युक्त खते ही पिकांच्या शरीरात तत होणाऱ्या रासायनिक व भौतिक घडामोडीसाठी स्टार्च व शर्करा तयार करणे व त्यांच्या वहनासाठी व वनस्पतीची खोडे मजबूत होण्यासाठी उपयोग होतो. परिणामी पिकांचे कीड रोगापासून संरक्षण होते.

पोटॅश हा उत्पादनाची चव रंग तजेलदारपणा व टिकावू क्षमता हे गुण ठरविणारा घटक आहे. याचा परिणाम बाजारात चांगल्या प्रतिचे उत्पादनाला चांगला बाजारभाव मिळण्यास होतो. वातावरणातील अचानक बदलामुळे पिकांवर येणारा जैविक अजैविक ताण यांना सामोरे जाताना पोटेंश पिकांना मदत करत असतो.

पोटॅश खते खरेदी करताना खताच्या पिशवीवरील पोटॅशचे प्रमाण वाचून अथवा माहिती घेऊन खताची खरेदी करावी. पिकांना खताची मात्रा वापरतांना पीडीएममधून प्रति बॅग सव्वा सात किलो किलो तर म्युरेट ऑफ पोटॅश मधून प्रति बॅग ३० किलो पालाश मिळते, या गोष्टीचा विचार करून खताची मात्रा ठरवावी.” असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी सांगितले.

Exit mobile version