Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यस्तरीय सूर्योदय साहित्य पुरस्कारांसाठी आवाहन

 

जळगाव, प्रतिनिधी | शहरातील सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या सतराव्या वर्धापन दिनानिमीत्त जानेवारी २०१८ ते ऑगस्ट २०१९ या कालावधीत मराठीतून प्रकाशित झालेल्या साहित्य कृतींना राज्यस्तरीय सूर्योदय साहित्य पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

परिक्षकांचा निर्णय अंतीम राहणार असून रूपये २०१ भरून मंडळाचे एक वर्षाचे सर्वसाधारण सभासदत्व स्विकारणे बंधनकारक आहे. यासाठी राष्ट्रीयकृत बँकेचा धनादेश अध्यक्ष सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ जळगाव या नावाने काढावा. पुरस्कार प्रदान सोहळा मार्च २०२० मध्ये नामवंत लेखक प्रा. डॉ. म. सु. पगारे यांच्या अध्यक्षतेखाली जळगावी होणारे एक दिवसीय राज्यस्तरीय सोळावे सूर्योदय मराठी साहित्य संमेलनात करण्यात येईल.पुरस्कार पोस्टाने पाठवला जाणार नाही. सूर्योदयचे पदाधिकारी यात सहभागी होऊ शकणार नाहीत. सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाच्या पुरस्कारासाठी असा उल्लेख पुस्तक पाठवतांना करायचा असून पुस्तकाची एकच प्रत पाठवावी. निवड झाल्यानंतर दुसरी प्रत नंतर मागविण्यात येईल.स्व. दलिचंद बस्तिमल सांखला यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय व खानदेशस्तरीय सूर्योदय काव्य पुरस्कार काव्य संग्रहास देण्यात येणार आहे. यात अनुक्रमे १५००, ११०० रूपयांचा धनादेश,असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. स्व श्रीमती रामकुंवरबाई इंदरचंद देसर्डा यांच्या स्मरणार्थ ललित लेखसंग्रहास राज्यस्तरीय सूर्योदय अक्षररत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. यात २,००० रूपयांचा धनादेश, गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. स्व सौ.जिसकुँवर भगवानसिंग गिरासे यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय सूर्योदय साहित्य पुरस्कार कादंबरीला देण्यात येणार आहे. स्व सौ.जशोदाबाई कालुसिंह परदेशी यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय सूर्योदय कथा पुरस्कार कथा संग्रहास देण्यात येणार आहे. दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप २,५०० रूपयांचा धनादेश, गौरवपत्र असे आहे.श्री दलुभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित स्व. राजेंद्र राणीदान जैन यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय सूर्योदय शब्ददीप पुरस्कार समीक्षा ग्रंथास देण्यात येणार आहे. यात २,००० रुपयांचा धनादेश, गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.स्व. दामू वासनकर यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय सूर्योदय बालकथा पुरस्कार बालकथा संग्रहाला तर स्व. सौ. उमादेवी शर्मा यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय सूर्योदय बालकाव्य पुरस्कार बालकाव्य संग्रहास देण्यात येणार आहे. अनुक्रमे रूपये १ हजार , ७०० रुपयांचा धनादेश ,गौरवपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. दि. २५ सप्टेंबर २०१९ पर्यंत रजिस्टर टपालाने सतीश जैन अध्यक्ष सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ , माँ, प्लाट नं ३१ गट नं २\२ ब, शिंदे नगर , पिंप्राळा जळगाव ४२५००२ या पत्त्यावर पाठवण्याचे आवाहन सचिव डी. बी. महाजन, सल्लागार साहेबराव पाटील, उपाध्यक्ष प्रवीण लोहार यांच्या सह खानदेशातील जिल्हा व तालुकाध्यक्ष यांनी केले आहे.

Exit mobile version