Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

Appeal : कापूस वाणांची अनधिकृतपणे विक्री संदर्भात खबरदारी घ्या – जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी  

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अनेक बोगस कंपन्या / व्यक्ती / संस्था कापूस बियाणे विकत असल्याची माहिती समोर आली आहे. अशा कापूस वाणांची अनधिकृतपणे विक्री करत असल्याचे दिसून आल्यास खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

बीटी कापसाच्या बियाण्यामध्ये परवानगी नसलेले तणनाशकाला सहनशिल असणारे Transgenic Glyphosate / Herbicide Tolerant trait  वापरुन अनेक बोगस कंपन्या / व्यक्ती / संस्था कापूस बियाणे विकत असल्याची माहिती समोर आली आहे.

एचटीबीटी या अवैध कापूस बियाण्यापासून पर्यावरणास असलेला धोका, जमिनीची सुपीकता नष्ट हेण्याचा धोका संभवत आहे. नागरीकांच्या अन्न्‍ सुरक्षेला असलेला धोका विचारात घेता, खरीप हंगाम २०२२ मध्ये कोणत्याही परिस्थीती शेतकरी बांधवांनी अशा वाणांची लागवड करु नये, तसेच या वाणाचे अवैधरीत्या व बिना बिलाने खरेदी करु नये.

अशा कापूस वाणांची अनधिकृतपणे विक्री करत असल्याचे दिसून आल्यास या कार्यालयाचा दुरध्वनी क्र. ०२५७- २२३९०५४ वर माहिती दयावी. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

Exit mobile version