Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अपार्टमेंटच्या पार्कींगमधून दुचाकी लांबविली

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील यश लॉन्सजवळील गौरी प्राईड अपार्टमेंटच्या पार्कींगमधून दुचाकी लांबविल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील यश लॉन्सजवळील गौरी प्राईड अपार्टमेंट येथील रहिवासी अशोक दशरथ वानखेडे हे कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. त्यांच्याकडे (एमएच १९ डीजी ५१४८) क्रमांकाची दुचाकी आहे. २२ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास काम आटोपून घरी आले. त्यांनी मोटारसायकल अपार्टमेंटच्या पार्कींगमध्ये लावून घरी गेले. दुसर्‍या दिवशी सकाळी ते कामावर जाण्यासाठी निघाले असता, त्यांना पार्कींगमध्ये दुचाकी दिसून आली नाही. त्यांनी संपुर्ण परिसरात दुचाकीचा शोध घेतला असता त्यांना दुचाकी मिळून आली नाही. त्यांनी सोमवारी शहर पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version