मोहाडी रोड येथे अँटीजन तपासणी शिबीर संपन्न

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील मोहाडी रोड येथे आज इंडियन रेडक्रॉस सोसायटी व जनमत प्रतिष्ठान ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेकडून विनामूल्य कोरोना अँटीजन तपासणी शिबिर संपन्न झाले.

शहरातील आज रुद्रा कॉम्प्युटर, मोहाडी रोड प्रभाग 13 मध्ये विनामूल्य कोरोना अँटीजन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन जळगाव शहराच्या महापौर जयश्री महाजन यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पूजन करून, अध्यक्ष नगरसेविका निता सोनवणे, विवेक सोनवणे यांनी कार्यक्रमाचा शुभारंभ केला. जळगाव शहर पूर्णपणे कोरोना मुक्त करून स्वच्छ शहर सुंदर शहर जळगाव शहर आपण सर्वांनी मिळून बनवूया, असे सुद्धा महापौर जयश्री महाजन यांनी सांगितले.

याप्रसंगी जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे योगेश सपकाळे, दिनेश तेजी यांनी सहकार्य लाभले, पोलीस सेवा संघटनेचे भावेश ठाकूर, महेश पाटील, तीलोत्तामदास बोंडे, हर्षाली पाटील, किरण कोलते, नितीन सपके, विनय नेहेते, मोतीलाल परडी, हितेश भावसार, हेमंत वैद्य, दिपाली पाटील, शोभा अशोक पाटील, किरण कोलते, विश्र्वेश खंडेलवाल, विजय सोनवणे, आर, सी, पाटील आदींची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे नियोजन पंकज नाले, महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. प्रभागातील बहुसंख्य लोकांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली व प्रभागातील बऱ्याच नागरिकांनी अँटीजन तपासणी करून घेतली. शहरात प्रत्येक प्रभागमध्ये शिबिर घेऊन शहर कोरोनामुक्त करण्याचे जनमत प्रतिष्ठानचे अभियान आहे.

Protected Content