Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सीएए व एनआरसी विरोधात मुंबईत महामोर्चा

4Sharad 20Pawar 201 3

मुंबई प्रतिनिधी । सीएए आणि एनआरसीच्या विरोधात महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील घटक पक्षांसह सर्व डावे पुरोगामी पक्ष आणि संघटना एकत्रीतपणे येत्या २४ जानेवारीला महामोर्चा काढणार असून याचे नेतृत्व शरद पवार करणार आहेत.

दिनांक २४ जानेवारी रोजी दुपारी दादरच्या हुतात्मा बाबू गेनू कामगार स्टेडियमवर विशाल रॅली आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार करणार असून आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याप्रसंगी लोक भारतीचे आमदार कपिल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार किरण पावसकर, काँग्रेस पार्टीचे एकनाथ गायकवाड व सचिन सावंत, समाजवादी पार्टीचे मिराज सिद्दीकी, सीपीआयचे प्रकाश रेड्डी, राष्ट्र सेवा दलाचे विश्‍वस्त व अंजुमने इस्लामचे चेअरमन डॉ. जहीर काझी, बीआरएसपीचे सुरेश माने, सीपीएमचे डॉ. अशोक ढवळे, जनता दल सेक्युलरचे प्रभाकर नारकर, मलविंदसिंग खुराणा, सीटीझन्स फोरम अगेन्स्ट एनआरसी, एनपीआरचे फारूक शेख, भटके विमुक्त समाज नेते डॉ. कैलास गौड, छात्र भारतीचे सचिन बनसोडे यांची उपस्थिती होती. या महामोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे करणार आहेत.

Exit mobile version