Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आणखी एका सुशांतची आत्महत्या !; व्हॉट्सॲपवर दिली स्वत:लाच श्रद्धांजली

सांगली – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अभिनेता सुशांतसिह राजपूतने आत्महत्या केल्याचे मानले जात असतांना त्यांनतर सांगलीतील एका सुशांतने व्हॉट्सॲप स्टेटसवर स्वत:चाच फोटो टाकून श्रध्दांजली वाहत प्रेमभंगातून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, “सांगलीतील वाळवा खेड रस्त्यावरील नागठाणेत एका गोठ्यामध्ये सुशांत भरत तोडके हा २६ वर्षीय युवक शेतमजुरीचे काम करायचा. या याने गोठ्यामध्येच त्याने सोमवारी सकाळी गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

प्रेमभंगाने खचलेल्या या तरूणाने सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आत्महत्येपूर्वी मोबाईलवरील व्हॉट्सॲप स्टेटसवर

‘इतने अनमोल तो नही,

लेकिन हमारी कदर याद रखना

शायद हमारे बाद कोई

हम जैसा ना मिले.”

या विरह गीताची ध्वनी चित्रफित आणि त्यांनतर अर्ध्या तासाने स्वत:चा फोटो टाकून भावपूर्ण श्रध्दांजलीचा संदेश प्रसारित केला.

सुशांत हा ईशान गावडे यांच्या खोलीत भाड्याने वास्तव्यास असल्याने  भावपूर्ण श्रध्दांजलीचा संदेश पाहताच सुशांतच्या पालकांनी गावडे यांच्याशी संपर्क साधत चौकशी करण्याची विनंती केली. गावडे यांनी त्याला शोधले असता गोठ्यात सुशांतने आत्महत्या केल्याचे समोर आले.

Exit mobile version