Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताला वेटलिफ्टिंगमध्ये आणखी एक पदक; गुरुराज पुजारी यांना कांस्य

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताने वेटलिफ्टिंगमध्ये आज आणखी एक पदक प्राप्त केलं आहे. गुरुराज पुजारी यांनी ६१ किलो वजनी गटात हे कांस्य पदक मिळवलं आहे.

इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टर चांगली कामगिरी करतांना दिसून येत असून आजच्या दिवसात भारताने आणखी एका पदकाला गवसणी घातली आहे. भारताच्या गुरुराज पुजारी यांनी एकूण २६९ किलोग्राम वजन उचलत ६१ किलो वजनी गटात कांस्य पदक मिळवलं आहे.

भारताने काही वेळापूर्वी संकेत सरगर यांनी ५५ किलो वजनी गटात एकूण २४८ किलोग्राम वजन उचलत रौप्य पदक प्राप्त केलं होतं त्यानंतर आता गुरुराज पुजारी यांनी कांस्य पदक जिंकलं आहे.  मलेशियाच्या मोहम्मद याने २४९ किलोग्राम वजन उचलत सुवर्णपदक मिळवलं. 

Exit mobile version